Free Ration : केंद्र शासनाचा मोठा निर्णय! 80 कोटी जनतेला पुढील वर्षी अशाप्रकारे मिळणार मोफत रेशन :

Spread the love

Free Ration : केंद्र शासनाने शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशांमधील सर्वसामान्य जनतेबद्दल एक मोठा निर्णय घेतला आता देशभरातील जनतेला बैठकीत घेतलेल्या या निर्णयामुळे मोफत रेशन मिळणार आहे ह्या बैठकी बद्दल व निर्णयाबद्दल संपूर्ण माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिलेली आहे

अन्नसुरक्षा कायदे अंतर्गत केंद्र शासनाने जवळपास 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचा निर्णय आणखी एका वर्षासाठी वाढवला आहे या निर्णयामुळे केंद्र शासनावर आता दोन लाख कोटी रुपयांचा जास्तीचाच बोजा पडणार

सर्वसामान्य आणि गरीब जनतेला रेशन घेण्यासाठी एकही रुपया खर्च करावा लागणार नाही केंद्र शासनाच्या या योजनेवर केंद्रशासन प्रत्येक वर्षी दोन लाख कोटी रुपये इतकी रक्कम खर्च करत आहे यापूर्वीच्या केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे या योजनेची मुदत वाढवली आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिलेली आहे

कोरोना कालखंडामध्ये लोकांना दिलासा देण्याकरिता शासनाने ही योजना राबवण्यास सुरुवात केली आहे मागील 28 महिन्यांमध्ये केंद्र शासनाने गरीब व सर्वसामान्य जनतेला रेशन देण्याकरिता 1.80 लाख कोटी रुपये इतकी रक्कम खर्च केली आहे

ज्यावेळी कोविड चे संकट पडले त्या काळातच 2020 च्या मार्च महिन्यामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना शासनाने राबवली या योजनेच्या माध्यमातून देशातील 80 कोटी लोकांना लाभ देण्यात आला आहे

या योजनेअंतर्गत ज्या नागरिकांकडे बीपीएल कार्ड आहे अशा कुटुंबीयांना प्रत्येक महिन्याला प्रत्येक व्यक्तीस चार किलो गहू आणि एक किलो तांदूळ पूर्णपणे मोफत दिला जातो गेल्या काही दिवसांपासूनच या योजनेच्या मदतीला देखील वाढ करण्याचे प्रयत्न चालू आहेत .

Leave a Comment