महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Road Transport Corporation , Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 200 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये डिझेल मेकॅनिक ( यांत्रिक डिझेल ) पदांच्या 55 जागा , मोटार मेकॅनिक ( यांत्रिक मोटारगाडी ) पदांच्या 50 जागा , इलेक्ट्रिशन ( विजतंत्री ) पदांच्या 20 जागा , शीटमेटल वर्कर ( पत्राकारागीर ) पदांच्या 20 जागा , टर्नर ( कातारी ) पदांच्या 05 जागा , वेल्डर ( सांधाता ) पदांच्या 20 जागा , मशिनिस्ट पदांच्या 05 जागा , मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एयर कंडीशनिंग पदांच्या 05 जागा , तसेच फिटर पदांच्या 20 जागा अशा एकुण 200 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : वरील सर्व पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी ( SSC ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तसेच संबंधित पदांनुसार ट्रेडनिहाय आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : सातारा सैनिक शाळा मध्ये विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे www.https://apprenticeshipindia.org/ या संकेतस्थळावर Maharashtra State Board Transport Corporation Ratnagiri Division मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आहेत . त्यानंतर राज्य परिवहन विभागीय कार्यालय रत्नागिरी येथे दि.26.09.2023 ते 05.10.2023 या कालावधीमध्ये विहीत नमुन्यातील अर्ज प्राप्त होईल ते भरुन सादर करायचे आहेत
.परीक्षा शुल्क : सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 500/- + 90 रुपये ( GST ) = 590/- रुपये तर मागास प्रवर्गकरीता 250/-रुपये + 95/- ( GST) = 295/- रुपये अशी परीक्षा शुल्क आकारण्यात येतील .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- समता नागरी सहकारी पतसंस्था नगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुर अंतर्गत लिपिक , शिपाई पदांच्या 358 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 4039 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका .
- ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 614 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका .