भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड पुणे , मुंबई , देवळाली , अहमदनगर या ठिकाणी मेसेंजर , डाफरी , स्वयंपाकी , मजदुर , माळी अशा विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( HQ Southern Commadant Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 24 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये मल्टी स्टाकिंग स्टाफ ( मेसेंजर , डाफरी ) , स्वयंपाकी , वॉशरमन , मजदुर , माळी अशा विविध पदांच्या 24 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मेसेंजर ( MTS ) | 13 |
| 02. | डाफरी ( MTS ) | 03 |
| 03. | स्वयंपाकी | 02 |
| 04. | वॉशरमन | 02 |
| 05. | मजदूर | 03 |
| 06. | माळी ( गार्डनर ) | 01 |
| एकुण पदांची संख्या | 24 |
शैक्षणिक पात्रता : वरील सर्व पदांकरीता उमेदवार हे 10 वी ( मॅट्रीक ) किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तर स्वयंपाकी या पदाकरीता उमेदवारास स्वयंपाकाचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : नागरी सहकारी बँकेत अधिकारी, लिपिक पदांसाठी मोठी पदभरती !
वयोमर्यादा : वरील सर्व पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 08.10.2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.hqscrecruitment.in/index.php या संकेतस्थळावर दिनांक 08.10.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता उमेदवारांकडून आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !