राज्यात बहुउद्देशिय कर्मचारी (मेसेंजर ,डाफरी ) , स्वयंपाकी , वॉशरमन , मजदुर , माळी या नियमित पदांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !

Spread the love

भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड पुणे , मुंबई , देवळाली , अहमदनगर या ठिकाणी मेसेंजर , डाफरी , स्वयंपाकी , मजदुर , माळी अशा विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( HQ Southern Commadant Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 24 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये मल्टी स्टाकिंग स्टाफ ( मेसेंजर , डाफरी ) , स्वयंपाकी , वॉशरमन , मजदुर , माळी अशा विविध पदांच्या 24 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मेसेंजर ( MTS )13
02.डाफरी ( MTS )03
03.स्वयंपाकी02
04.वॉशरमन02
05.मजदूर03
06.माळी ( गार्डनर )01
 एकुण पदांची संख्या24

शैक्षणिक पात्रता : वरील सर्व पदांकरीता उमेदवार हे 10 वी ( मॅट्रीक ) किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तर स्वयंपाकी या पदाकरीता उमेदवारास स्वयंपाकाचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : नागरी सहकारी बँकेत अधिकारी, लिपिक पदांसाठी मोठी पदभरती !

वयोमर्यादा : वरील सर्व पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे  दिनांक 08.10.2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.hqscrecruitment.in/index.php  या संकेतस्थळावर दिनांक 08.10.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता उमेदवारांकडून आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment