NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत विविध पदांच्या 91 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NABARD RECRUITMENT FOR VARIOUS POST , NUMBER OF POST VACANCY – 91 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड A ( RDBS ) | 85 |
| 02. | सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड A ( विधी सेवा ) | 02 |
| 03. | सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड A ( प्रोटोकॉल व सुरक्षा ) | 04 |
| एकुण पदांची संख्या | 91 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : 60 टक्के गुणांसह संबंधित विषयात पदवी / बी.ई / बी.टेक / एमबीए / बीबीए / बीएमएस / पी.जी डिप्लोमा / सी.ए अर्हता ( मागास / अपंग प्रवर्ग करीता गुणांमध्ये 05 टक्के ची सुट )
पद क्र.02 साठी : 60 टक्के गुणांसह एलएलबी ( मागास / अपंग प्रवर्ग करीता गुणांमध्ये 05 टक्केची सुट )
पद क्र.03 साठी : लष्कर , नौदल अथवा हवाई दल मध्ये किमान 05 वर्षे सेवा असलेला कमिशन्ड अधिकारी .
हे पण वाचा : लेखनिक (लिपिक) पदाच्या 434 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.07.2025 रोजी वय हे 21-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 850/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 150/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.nabard.org/ या संकेतस्थळावर दिनांक 08.11.2025 ते दि.30.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026