भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 5647 जागेसाठी आत्ताची नविन मेगाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 5647 जागेसाठी आत्ताची नविन मेगाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( North East Frontier Railway Recruitment for Variuos post , Number of post vacancy – 5647 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये प्लंबर , कारपेंटर , वेल्डर , मेकॅनिक , इलेक्ट्रिशियन , पाईप फिटर , टर्नर , मशिनिस्ट , इलेक्ट्रिशियन , सव्हेअर , सहाय्यक , कॉम्प्युटर ऑपरेटर , खाते , मेडिकल फिल्ड स्टाफ इ. पदांच्या तब्बल 5647 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक शैक्षणिक अर्हता : 10 वी / 12 वी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट ब व क संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती ; Apply Now !

वयाची मर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 15-24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल तर SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://app.nfr-recruitment.in/#/auth/landing  या संकेतस्थळावर दि.03.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . तर सदर पदभरती प्रक्रिया करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment