NPCIL ; न्युक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इं‍‍डिया मध्ये विविध पदांच्या एकुण 335 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

न्युक्लिर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या एकुण 335 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nuclea Power Corporation of India limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 335 ) पदांचे नावे , पदसंख्या , पात्रता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदसंख्या
01.फिटर94
02.इलेक्ट्रिशियन94
03.इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक94
04.कोपा14
05.टर्नर13
06.मशिनिस्ट13
07.वेल्डर13
 एकुण पदांची संख्या335

आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय ( ITI ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : बँक ऑफ इंडिया मध्ये 143 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 04.04.2024 रोजी किमान वय हे 14 वर्षे तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल तर अपंग प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 10 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 04.04.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment