माजी सैनिक आरोग्य सहयोग योजना अंतर्गत अधिकारी , चालक , चौकीदार , शिपाई , लिपिक इ.पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ex-Serviceman Contributory Health Scheme Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 21 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : OIC पॉलिक्निनिक पदांच्या 01 जागा , वैद्यकीय अधिकारी पदांच्या 01 जागा , दंत अधिकारी पदांच्या 02 जागा , लॅब तंत्रज्ञ पदांच्या 01 जागा , फार्मासिस्ट पदांच्या 01 जागा , चालक पदांच्या 02 जागा , चौकीदार पदांच्या 02 जागा , महिला परिचर पदांच्या 03 जागा , सफाईवाला पदांच्या 03 जागा , लिपिक पदांच्या 03 जागा , रेडिओग्राफर पदांच्या 01 जागा , तर दंत तंत्रज्ञ पदांच्या 01 जागा अशा एकुण 21 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
पात्रता : यांमध्ये वैद्यकीय अधिकारी / दंत अधिकारी पदांकरीता उमेदवार हे एमबीबीएस अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर लॅब तंत्रज्ञ पदाकरीता बी.एस्सी मेडिकल लॅब टैक तर फार्मसी पदाकरीता उमेदवार हे बी फार्मसी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत .
चालक , चौकीदार , महिला परिचर या पदाकरीता उमेदवार हे इयत्ता 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर सफाईवाला पदाकरीता उमदेवार हे साक्षर असणे आवश्यक असणार आहेत .तर उर्वरित पदांकरीता उमेदवार हे संबंधित ट्रेड मध्ये पदवी / पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे OIC स्टेशन हेड कॉर्टर CAD पुलगाव तेह – देवळी जिल्हा वर्धा 442303 या पत्यावर दिनांक 21 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती करीता उमेदवारांकडून परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026