अखेर राज्य शासन सेवेत विविध पदांवर बाह्य यंत्रणेकडून तब्बल 40,000 जागांसाठी मोठी महाभरती , पदभरती शासन निर्णय निर्गमित !

Spread the love

राज्य शासनांच्या प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकासाच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याचे दृष्टीनें शक्य असेल तिथे बाह्य यंत्रणेमार्फत कामे करुन घेण्याचे शासनाचे धोरण आहे . त्यामुळे वित्त विभागाच्या मान्यतेने दिनांक 18.06.2014 रोजीच्या शासन निर्णयान्वये वित्त मे.ब्रिस्क फॅसिलिटिज प्रा.लि. व क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा.लि या दोन निविदाकारांच्या पॅनलला तीन वर्षाच्या कालावधीसाठी मंजुरी देण्यात आली आहे .

सदर बाह्य यंत्रणेद्वारे सेवापुरवठादारांच्या सेवा घेणे राज्य शासनाचे शासकीय विभाग / निमशासकीय विभाग / स्थानिक स्वराज्य संस्था / महामंडळे / सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम इतर आस्थापना इ. यांना बंधनकारक असणार आहेत .

दिनांक 14.03.2023 च्या शासन निर्णय तसेच या शासन निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेले विविध आदेश / शुद्धीपत्रके व अर्धशासकीय पत्रे अधिक्रमित करण्यात येत आहेत .राज्य शासनाचे शासकीय विभाग / निमशासकीय विभग / स्थानिक स्वराज्य संस्था / महामंडळे / सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमे इतर आस्थापना इ . बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी शासन निर्णयांमध्ये नमुद केल्याप्रमाणे , अटी व शर्तींच्या अधिन राहून राज्य शासनांकडून मान्यता देण्यात आलेली आहे .

सविस्तर महाभरती जाहिरात पाहा

यांमध्ये प्रामुख्याने अतिकुशल , कुशल , अर्धकुशल , अकुशल अशा पद्धतीने मनुष्यबळांची वर्गवारी करण्यात आलेली आहे . यानुसारच मनुष्यबळांची पदभरती करण्यात येणार आहेत . मनुष्यबळाच्या वर्गवारीनुसार , वेतनमान / मानधन सदर पदभरती शासन निर्णयांमध्ये  नमुद करण्यात आलेले आहेत .

उपरोक्त नमुद केल्याप्रमाणे राज्य शासनांच्या शासकीय / निमशासकीय इतर आस्थापना कार्यालयांमध्ये आवश्यकता नुसार अतिकुशल , कुशल , अर्धकुशल , अकुशल मनुष्यबळांच्या एकुण 40,000 पदे भरण्यात येणार आहेत . सदर पदांसाठी वेतनमान हे नमुद केल्याप्रमाणे कंपनीमार्फत अदा करण्यात येणार आहेत .

या संदर्भात राज्य शासनांकडून दिनांक 06.09.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर मेगाभरती शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

सविस्तर मेगाभरती शासन निर्णय पाहा

Leave a Comment