पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तब्बल 9,785 रिक्त पदे असून सदर रिक्त पदांवर लवकरच महानगरपालिका प्रशासनाकडुन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .सध्याच्या घडीला पिंपरी पिंचवड महानगरपालिकेत एकुण 16,838 पदे मंजुर आहेत , यापैकी जे पदे रिक्त आहेत .अशा पदांवर मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
संवर्गनिहाय विचार केला असता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एकुण 16,838 पदे मंजुर आहेत , यापैकी पालिका प्रशासनाकडुन 7 हजार 53 पदे भरलेली आहेत . तर एकुण 9 हजार 785 पदे रिक्त आहेत .यामध्ये सर्वात जास्त रिक्त पदे हे वर्ग क संवर्गातील आहेत .लिपिक टंकलेखक पदांचे सर्वात जास्त 1000 पेक्षाही जास्त पदे रिक्त आहेत .
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये संवर्गनिहाय रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात .
संवर्ग | मंजुर पदे | भरलेली पदे | रिक्त पदे |
अ | 475 | 162 | 313 |
ब | 557 | 218 | 339 |
क | 8041 | 3321 | 4720 |
ड | 7765 | 3352 | 4413 |
एकुण | 16838 | 7053 | 9785 |
वरील तक्त्याप्रमाणे सर्वच संवर्गातील रिक्त पदांचे प्रमाणे मोठे असल्याने , सदर रिक्त पदांवर लवकरच पदभरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत .सदरची पदभरती प्रक्रिया ही दि.15 मे 2023 पुर्वीच पार पाडण्याचे पालिका प्रशासनाला अधिसुचित करण्यात आलेले आहेत .
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !
- दक्षिण पुर्व -मध्य ( नागपुर ) रेल्वे विभाग अंतर्गत 1007 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEST : बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत बस चालक व वाहक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !