राज्यात 4122 तलाठी पदांसाठी अखेर ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरु ! जिल्हानिहाय रिक्त पदे जाहीर !

Spread the love

महाराष्ट्र राज्यात तलाठी पदांच्या एकुण 4122 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने पदभरती प्रक्रिया सुरुवात करण्यात आलेली आहे .ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात ही फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासुन सुरुवात होणार आहे . तर ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी परीक्षा मार्च महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार आहे .

याकरीता महाराष्ट्र महसूल व वन विभागाकडुन विभागानुसार , जिल्हानिहाय रिक्त , मंजुर व अतिरीक्त वाढीव पदे बाबत तपशिल सादर करण्यात आलेला आहे .महाराष्ट्र राज्य शासन सेवेत तलाठी पदांचे दि.31.12.2020 रोजी एकुण 1020 पदे रिक्त आहेत . तर राज्य शासनाकडुन तलाठी संवर्गातील नव्याने 3110 पदे निर्माण करण्यात आले आहेत .

तलाठी पदासाठी आवश्यक पात्रता – तलाठी पदाकरीता अर्ज सादर करण्याकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवीधारक असणे आवश्यक आहे किंवा समकक्ष शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे .तसेच उमेदवार हा MSCIT / CCC किंवा संगणक हाताळणी प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

आवश्यक कागतपत्रे – तलाठी पदासाठी अर्ज सादर करण्याकरीता उमेदवाराकडे सर्व शैक्षणिक कागतपत्रे असणे आवश्यक आहे .( SSC /HSC व पदवी गुणपत्रक / प्रमाणपत्र , पदवी प्रमाणपत्र ) जातीचा दाखला , रहिवाशी प्रमाणपत्र , आधार कार्ड , उत्त्पनाचा दाखला , नॉन क्रिमिलियर इत्यादी ..

विभाग व जिल्हानिहाय तलाठी संवर्गातील रिक्त पदांची संख्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

जिल्हानिहाय रिक्त पदे पाहा

Leave a Comment