Megabharati 2023 : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सर्व महानगरपालिका , नगरपरिषदा त्याचबरोबर नगरपंचायतींमधील रिक्त पदांवर राज्य शासनाकडुन मोठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .सध्या राज्यातील महानगरपालिका , नगरपरिषद तसेच नगरपंचायती मध्ये 55 हजार पेक्षा अधिक पदे हे रिक्त आहेत .
या रिक्त पदांपैकी 40 हजार जागांसाठी पदभरती करण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाकडुन घेण्यात आलेला आहे . याबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांनी परिपत्रक काढुन संबंधित पालिका / परिषदा प्रशासनाला अवगत करण्यात आले आहेत .यावर पालिका प्रशासनाने तात्काळ हालचाली सुरु केल्या आहेत .राज्याचे मुख्यमंत्री व राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांच्या मुख्याधिकारी / आयुक्त यांच्यासमवेत दि.11.01.2023 रोजी सह्याद्री अतिथीगृहात बैठक आयोजित करण्यात आली असता सदर पदभरतीचा निर्णय घेण्यात आला .
यामध्ये पालिका प्रशासनातील विविध पदे डॉक्टर , शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , शिपाई , सफाईगार , वाहनचालक , वरीष्ठ अधिकारी , लेखाधिकारी , सांख्यिकी सहाय्यक इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत . रिक्त पदांपैकी लिपिक पदांच्या संख्या अधिक आहेत , तर शिपाई हे वर्ग -4 मधील पदे देखिल मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत .
यापैकी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने यापुर्वीच 10 हजार जागांसाठी रिक्त पदांचा अहवाल सादर केला आहे तर पिंपरी चिंचवड पालिकेने 9000+ जागांसाठी पदभरती करणेबाबत अहवाल राज्य शासनास सादर केलेला आहे .ही सर्वात मोठी महाभरती असणार असल्याने , राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे .
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !