ग्रामसेवक मेगाभर्ती 2023 ! राज्यात शासन सेवेत ग्रामसेवक पदांच्या तब्बल 13,656 जागांसाठी मेगाभर्ती ! Apply Now !

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासन सेवेत ग्रामसेवक पदांच्या तब्बल 13656 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .सध्या राज्य शासन सेवेत ग्रामसेवक पदांच्या मंजुर पदांपैकी 5000+ पदे रिक्त आहेत . तर उर्वरित पदे हे अतिरिक्त वाढीव पदे राज्य शासनाकडुन मंजुर करण्यात आल्या आहेत .सदर पदभरती ह्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणार आहेत .

जिल्हा परिषदांतील गट क संवर्गातील वाहनचालक आणि गट – ड संवर्गातील पदे वगळून रिक्त पदे व संवर्गनिहाय आरक्षण नियमावली जिल्हा परिषदांकडुन तयार करण्यात आलेली असून , सदर रिक्त पदांवर जिल्हा निवड मार्फत परिक्षेचे आयोजन करण्यात येणार आहेत . ग्रामविकास विभागांकडुन संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत .

यामध्ये जिल्हा परिषदेमधील गट क संवर्गातील पदांच्या पदभरतीची जाहीरात दि.01 ते 7 फेब्रुवारी दरम्यान प्रसिद्ध करण्यात येईल .तर उमेदवारांकडुन दि.22 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येईल .तर ऑनलाईन पद्धतीने दि.14 ते 30 एप्रिल दरम्यान परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहेत .

ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , यापैकी ग्रामसेवक पदांचे एकुण 13656 जागांसाठी पदभरती करण्यात येणार आहे .यासंदर्भात ग्रामविकास विभागाकडुन निर्गमित झालेला सविस्तर पदभरती शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

पदभरती शासन निर्णय

Leave a Comment