पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या तब्बल 9,785 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . यामध्ये वर्ग क व वर्ग ड संवर्गातील पदांचा समावेश आहे .पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एकुण 16 हजार पदांचा समावेश असून , त्यापैकी रिक्त असणाऱ्या जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
सध्या पिंपरी चिचवड पालिकेमध्ये एकुण संवर्ग अ,ब,क व ड संवर्गातील एकुण 16,838 पदे मंजुर आहेत .यापैकी सध्या एकुण 7053 जागा भरलेली आहेत . तर मंजुर पदांपैकी 9,785 जागा रिक्त आहेत .राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सुचनेनुसार , राज्यातील पालिका प्रशासनांमध्ये एकुण 40 हजार पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्याचे उद्दिेष्ट्ये समोर ठेवले आहेत .सदर सुचनेनुसार पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनाकडून भरतीची नोटीफिकेशन जारी केलेली आहे .
15 मे 2023 पुर्वी पदभरती प्रक्रिया पुर्ण करण्याचे आदेश –
राज्यातील पालिका प्रशासनांमध्ये रिक्त असलेल्य पदांवर येत्या 15 मे 2023 पुर्वी पदभरती प्रक्रिया पुर्ण करण्याचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आलेले आहेत .सदर आदेशानुसार , दि.15 मे 2023 पर्यंत पदभरती प्रक्रिया राबविण्याकरीता पालिका प्रशासनांकडून सविस्तर नोटीफिकेशन व रिक्त वर्गनिहाय रिक्त पदांचे विवरण जाहीर करण्यात आलेले आहेत .
सदर रिक्त पदांवर लवकरच मोठी मेगाभरर्ती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने , राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना पालिका प्रशासनांमध्ये नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026