पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत विविध पदांच्या तब्बल 16,838 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , सध्या पालिका प्रशासनांमध्ये आस्थापना कर्मचाऱ्यांच्या मंजुर पदसंख्येमध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय पालिका प्रशासनांकडून घेण्यात आलेला आहे . या अगोदर पिंपरी चिंचवड पालिकेच्या सर्व संवर्गातील आस्थापना कर्मचाऱ्यांची मंजुर संख्या 11,513 होती .
आता पालिकेची वाढती हद्द व वाढती लोकसंख्येचा विचार करुन , पालिकेमध्ये मंजुर कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये 5,325 पदांची वाढ करण्यात आलेली आहे .यामुळे पालिका प्रशानांच्या आस्थापना बिंदुनामवलीमध्ये बदल करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे . राज्य शासनांच्या मंजुरीनंतर PCMC मध्ये पदभरतीस लगेच सुरुवात होणार आहे .
यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय अधिकारी , उद्यान निरीक्षक , कनिष्ठ लिपिक , अग्निशमन अधिकारी , शिक्षक , विधी अधिकारी , कोर्ट लिपिक , समाजसेवक , सफाईगार , शिपाई , उद्यान अधिक्षक , सहाय्यक अभियांत्रिकी , परिचारिका , भांडारपाल , सुपरवायझर , पशुसेवक , प्रयोगशाळा सहाय्यक इत्यादी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
सध्या पालिका प्रशासनांमध्ये वाढीव पदांचा विचार केला असता , एकुण मंजुर पदांपैकी 9,785 पदे रिक्त आहेत , तर त्यापैकी 7053 पदे भरलेली आहेत . सदरच्या रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .
- MDA Royal इंटरनॅशनल स्कुल लातुरअंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती ..
- BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट ब व क संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- फक्त 10 वी पात्रता धारकांसाठी हवाई सेवा अंतर्गत 142 जागेसाठी पदभरती ; 22530/- रुपये मिळेल वेतनमान .
- माध्यमिक विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- राज्य शासन सेवेत वर्ग – 4 ( परिचर , शिपाई , मदतनीस इ.) पदांच्या नियमित पदावर मोठी पदभरती..