पिंपरी चिंचवड पालिका मध्ये आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया ,लगेच करा आवेदन !

Spread the love

पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनांमध्ये विविध पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . ( PCMC : Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 203 ) सदर पदभरती संदर्भात आवश्यक पात्रता , पदसंख्या व इतर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

यांमध्ये कन्सल्टंट , कनिष्‍ठ कन्सल्टंट , हाऊसमन , भुलतज्ञ विभाग कन्सल्टंट , बालरोग विभाग कन्सल्टंट , बालरोग विभाग हाऊसमन , मेडिसीन / फिजिशिअन कन्सल्टंट , मेडिसिन /कन्सल्टंट रजिस्ट्रार , रेडिओलॉजिस्ट , कनिष्ठ कन्सल्टंट ,आर्थोपेडिक सर्जन , कान / घसा / नाक कन्सल्टंट ,मानसोपचार तज्ञ ,कनिष्ठ कन्सल्टंट रजिस्ट्रार अशा तब्बल 203 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र शासन सेवेत कोतवाल पदांसाठी मेगाभर्ती 2023 ! Apply Now !

पात्रता – वरील पदांकरीता उमेदवार हा MBBS / मेडिकल कौन्सीलकडी नोंदणी / M.D / DNB /DTCD /TDD/DD/DTMH मध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया – सदर पदांकरीता थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असून थेट मुलाखतीसाठी उमेदवारांनी वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय , पिंपरी चिंचवड पालिका , दुसरा मजला वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय पिंपरी या ठिकाणी दि.15 मे ते 17 मे 2023 या कालावधी हजर रहायचे आहे .

अधिक माहीतीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment