कोतवाल भरती : महाराष्ट्र शासन सेवेत कोतवाल पदांसाठी पदभरती , पात्रता फक्त 4 थी उत्तीर्ण !

Spread the love

महाराष्ट्र शासन सेवेत कोतवाल या पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधी ऑफलाईन / समक्ष आवदेन मागविण्यात येत आहेत . पदांसाठी आवश्यक पात्रता , वेतनमान , अर्ज प्रक्रिया या संदर्भातील सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहूयात ..

कोतवाल हे पद ग्रामपंचायत पातळीवर कार्यरत असून जिल्हा परिषद सेवेतील क्रमनिहाय शेवटचे पद असून , कोतवाल हे पद ग्रामपंचायत पातळीवर दस्ताऐवज सुस्थितीमध्ये ठेवणे , ग्रामसेवक , तलाठी व पोलिस पाटील यांनी वेळोवेळी सांगितलेले काम करणे , गावांमध्ये शांतता राखण्यासाठी पोलिस पाटील यांना मदत करणे , शासकीय मालमत्तेचे संरक्षण करणे , इत्यादी कामे कोतवाल यांना करावे लागते .

पात्रता – कोतवाल या पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 4 थी पास असणे आवश्यक आहे तसेच उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे . तर कमाल वयोमर्यादा 40 वर्षांपेक्षा अधिक असू नये . तसेच उमेदवार हा शारिरीक दृष्ट्या सक्षम असावा , तसेच उमेदवारांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा असू नये .

हे पण वाचा : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी मोठी मेगाभर्ती 2023 ! Apply Now !

परीक्षा पद्धती – सदर पदांकरीता 75 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल व लेखी परीक्षेमध्ये 35 टक्के प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची 25 गुणांची तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे .

अर्ज प्रक्रिया – पात्र उमेदवारांनी आपला अर्ज तहसीलदार समुद्रपुर यांच्या कार्यालयात तलाठी आस्थापना शाखेत दि.09.05.2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता उमदेवारांकडून 500/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल , तर मागास वर्गीय उमेदवारांकडून 300/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहे .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment