India Post : भारतीय टपाल महाराष्ट्र सर्कल मध्ये पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय टपाल महाराष्ट्र सर्कल अधिनस्त मेल मोटार सेवा मुंबई येथे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीत आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mail Motor Service Recruitment For Various Post , Number of Post Vacacny – 10 ) पदांचे नाव , पात्रता , वेतनमान याबाबत सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पात्रता / पदसंख्या – यांमध्ये कुशल कारागीर पदांच्य एकुण 10 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा सरकार द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्था कडून संबंधित व्यापारातील प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा उमेदवार हा इयत्ता 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

त्याचबरोबर उमेदवारास संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे तसेच मोटार वाहन मेकॅनिक पदांकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवाराने जड मोटार वाहने चालविण्यासाठी वैध वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे .

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.01 जुलै 2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे , तर यांमध्ये मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 वर्षांची तर इतर मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला  `THE SENIOR MANAGER, MAIL MOTOR SERVICE,134-A, SUDAM KALU AHIRE MARG, WORLl, MUMBA1 400018 या पत्त्यावर दि.13 मे 2023 पर्यंत अर्ज पोहोचेल अशा पद
धतीने अर्ज सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment