PCMC : पुणे महानगरपालिका मध्ये विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विहित कालावधी मध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .पदनाम , पात्रता ,वेतनात या संदर्भात सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
शिक्षक : यामध्ये प्राथमिक शिक्षक ,माध्यमिक शिक्षक अशा पदांच्या 45 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदासाठी उमेदवार हे B. A , BED उत्तीर्ण असणे आवश्यक आहेन, सदर पदाकरिता प्रतिमहा 35,000/- रुपये वेतनमान देण्यात येणार आहे.
कनिष्ठ लिपिक : कनिष्ठ लिपिक पदांच्या एकूण 02 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर त्याचबरोबर मराठी व इंग्रजी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . सदर पदाकरिता प्रतिमहा 20,000/- रुपये वेतनमान देण्यात येणार आहे .
पूर्णवेळ ग्रंथपाल : पूर्णवेळ ग्रंथपाल या पदांच्या एकूण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर ग्रंथालयाचा कोर्स अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा . सदर पदाकरिता प्रतिमहा 20,000 रुपये वेतनमान देण्यात येणार आहे.
हे पण वाचा : आदिवासी विकास विभागामध्ये 38,440 पदांसाठी मेगाभर्ती !
प्रयोगशाळा सहाय्यक : प्रयोगशाळा सहाय्यक या पदांच्या एकूण 02 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेला असावा . सदर पदाकरिता प्रतिमा 20,000/- रुपये वेतन मान देण्यात येणार आहे .
शिपाई : शिपाई पदांच्या एकूण 10 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार इयत्ता आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , सदर पदास प्रतिमहा 18,000/- रुपये वेतनमान देण्यात येणार आहे .
अर्ज प्रक्रिया : सदर जाहिरातीमध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज संपूर्ण कागदपत्रासह दिनांक 08 जून ते 14 जून या कालावधीमध्ये राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग स्कूल शिवदर्शन पुणे 41 10 09 या पत्त्यावर समक्ष येऊन जमा करायचे आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !