आदिवासी विकास विभागांमध्ये शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी तब्बल 38,440 जागांसाठी महाभरती !

Spread the love

राष्ट्रीय आदिवासी विकास विभागांमध्ये शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या तब्ल 38,440 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया संदर्भात राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समिती मार्फत महाभरती प्रक्रिया नोटिफिकेशन निर्गमित करण्यात आलेली आहे . शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या रिक्त पदांवर प्रथमच मोठ्या प्रमाणात महाभरती राबविण्यात येत आहेत .

सदरची पदे ही मागील दोन वर्षांपासून रिक्त असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने , राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समिती मार्फत रिक्त पदांवर व काही पदे नव्याने निर्माण करुन पदभरती करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .सदरची पदे ही केंद्र सरकारच्या आदिवासी विकास विभागांतर्गत असून , आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध करुन देण्यात येते .

यांमध्ये एकुण 23 पदांच्या तब्बल 38,440 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे , यांमध्ये मुख्याध्यापक , उपमुख्याध्यापक , पदवीधर शिक्षक , पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षक , कला शिक्षक , संगित शिक्षक , शारिरीक शिक्षण शिक्षक , ग्रंथपाल , समुपदेशक , स्टाफ नर्स , हॉस्टेल वॉर्डन , लेखापाल , वरीष्ठ सचिवालय सहाय्यक , कनिष्ठ सचिवालय सहाय्यक , केटरिंग सहाय्यक .

हे पण वाचा : महाराष्ट्र शासन सेवेत तब्बल 2,417 पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया !

तसेच वाहनचालक , इलेक्ट्रीशियन कम प्लंबर , लॅब अटेंडंट , माळी , स्वयंपाकी , चौकीदार , सफाईगार अशा 23 प्रकारच्या पदांसाठी तब्बल 38,440 जागेवर मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .सदरची पदभरती ही केंद्र सरकारच्या नियमित वेतनश्रेणीवर कायमस्वरुपी पद्ध्तीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची दिनांक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे .

अर्ज प्रक्रिया , पदांची नावे , निवड प्रक्रिया , वेतनश्रेणी या याबाबत सविस्तर माहितीसाठी केंद्र सरकारच्या आदिवासी विकास विभागांकडून निर्गमित करण्यात आलेली सविस्तर पदभरती नोटिफिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .

जाहीरात पाहा

अधिकृत्त संकेतस्थळ : www.tribal.nic.in या संकेतस्थळावर भेट देवून अधिकृत्त पदभरती जाहीरात ,अर्ज प्रक्रिया माहीती पाहु शकता ..

Leave a Comment