PM Kisan 13th Instalment: शेतकऱ्यांनो पीएम किसानच्या 13व्या हप्त्याची तारीख फिक्स झाली! मात्र अशा लोकांना शासन एक रुपयाही देणार नाही !

Spread the love

PM Kisan 13th Instalment : मित्रांनो तुम्हाला जर नियमितपणे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ भेटत असेल, लाभार्थ्यांच्या यादी मध्ये तुमचे देखील नाव समाविष्ट असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आता लवकरात लवकर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार असून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयोजनाने हे पैसे थेट लाभार्थी व्यक्तींच्या खात्यामध्ये हस्तांतरणाद्वारे जमा केले जातील. मागील वेळी जवळपास 8.42 कोटी शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून निधीचा लाभ देण्यात आलेला होता. यावेळी बऱ्याच शेतकऱ्यांची संख्या कमी होईल अशी शक्यता दिसत आहे.

बँक खाते आधारशी लिंक करा

कृषी उपसंचालक रामप्रवेश यांनी स्वतः या योजनेबद्दल असे सांगितले आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता 15 जानेवारीपासून ते 20 जानेवारी पर्यंतच्या दरम्यान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता दिसत आहे. याकरिता प्रलंबित असलेली कामे सात जानेवारीपर्यंत मार्गी लावणे गरजेचे आहे. तेराव्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शासन शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे यासोबत बॅक खाते आधार कार्ड लिंक करण्याचे आवाहन करत आहे.

याशिवाय मित्रांनो बँकेमध्ये जाऊन NPCI मध्ये आधार कार्ड लिंक केलेली बँक खाते घ्यावी. यादीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी वरील तीन कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर त्यांची पीएम किसान सन्मान निधी योजनेचे रक्कम त्याच्या खात्यामध्ये जमा केली जाणार नाही.

लाभार्थ्यांची संख्या 8.42 कोटी….

पीएम किसान सन्मान योजना ही एक केंद्रशासनाचे महत्त्वकांक्षा योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचे रक्कम 2000 च्या हप्त्यामध्ये तीनदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी संसदेमध्ये असे सांगितले होते की ऑगस्ट पासून ते नोव्हेंबर पर्यंतच्या कालखंडात बाराव्या हप्त्यात लाभार्थींची एकूण संख्या ही 8.42 कोटी इतकी होती. सुरुवातीला पहिल्या यादीत लाभार्थ्यांची संख्या 3.16 कोटी इतकी होती.

या योजनेमध्ये तांत्रिक अडचणीमुळे मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याची तक्रार शासनाकडे आली होती. त्यानंतर केंद्र शासनाने सोशल ऑडिट करून थेट तहसील स्तरावर केल्या गेलेल्या पडताळणीच्या आधारावर कोट्यावधी अपात्र शेतकऱ्यांची नावे यादी मधून काढण्यात आली.

पी एम किसान संबंधी योजनेच्या लाभार्थ्यांची यादी मध्ये तुमचे नाव तपासण्यासाठी तुम्ही पीएफ किसान च्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या. त्या ठिकाणी तुमचे नाव तुम्ही तपासू शकता. मित्रांनो अकराव्या हप्त्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ जवळपास 10.45 कोटी शेतकऱ्यांना देण्यात आलेला होता.

Leave a Comment