मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका , नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींमध्ये तब्बल विविध पदांच्या 40 हजार जागांसाठी मोठी मेगाभरर्ती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . सदर पदभरती तातडीने सुरु करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागांना दि.11.01.2023 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत दिलेले आहेत .
राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांच्या मुख्याधिकारी यांची राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दि.11.01.2023 रोजी सह्याद्री अतिथीगृहात बैठक अयोजित करण्यात आलेली होती . सदर बैठकीस मुंबई शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर , मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा तसेच नगरविकास विभागाचे मुख्य सचिव भूषण गगराणी , प्रधान सचिव सोनिया सेठी , बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यावेळी उपस्थित होते .
सदर बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून , राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदां तसेच नगरपंचायतीमध्ये रिक्त असणाऱ्या 55,000 पदांपैकी 40,000 जागेवर पदभरती लवकरच सुरु करण्याच्या सुचना मुख्यमंत्री शिंदे यानी दिल्या आहेत .यापैकी बृहन्मुंबई महानगरपालिकेने 8,490 पदांसाठी पदभरती प्रक्रिया सुरु केलेली आहे .सदर पदभरती प्रक्रिया रिक्त पदांचा संपुर्ण आढावा घेवून सर्व सेवाविषयक बाबी तपासुन पदभरती प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !