मोदी सरकार नियमितपणे देशभरातील जनतेसाठी विविध शासकीय योजना राबवत आहे. त्याचा फायदा देशभरातील करोडो नागरिकांना झाला आहे. आता केंद्रशासनांतर्गत खास विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना राबवली जात आहे. त्या योजनेचे नाव आहे शिष्यवृत्ती योजना.
PM Scholarship Yojana : मोदी सरकारच्या माध्यमातून देशभरातील जनतेसाठी यासोबतच विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. या विविध योजनांचा लाभ देशभरातील लाखो विद्यार्थी शेतकरी व इतर नागरिक घेत आहेत. आता मोदी सरकार खास विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला शिष्यवृत्ती देणार आहे.
आपल्या देशभरामध्ये असे काही विद्यार्थी आपल्याला दिसून येतील जे हुशार आहेत परंतु त्यांच्याकडे पुरेपूर शिक्षण घेण्यासाठी पैसे उपलब्ध नाहीत. म्हणजेच त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला शिष्यवृत्ती भेटेल. या माध्यमातून विद्यार्थी त्यांचे पुढील शिक्षण अगदी सुखरूप पणे घेऊ शकतील.
राज्य शासन व केंद्र शासनाच्या माध्यमातून गरीब व गरजू घराण्यातील मुला मुलींसाठी विविध शिष्यवृत्तीच्या योजना राबवल्या जात आहेत. हुशार व गुणी मुलांना शिक्षण घेत असताना कोणताही अडथळा निर्माण होता कामा नये हाच या शिष्यवृत्तीचा महत्वाचा उद्देश आहे.
मित्रांनो शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करायचा आहे. खास विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना पदवीच्या अभ्यासक्रमासाठी दिली जात असून ज्या विद्यार्थी विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर अशा विद्यार्थ्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे.
पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेचे उद्दिष्ट
दहशतवादांनी केलेल्या हल्ल्यामध्ये ज्या शहीद जवानांची मुले शाळेत आहेत. खास त्यांच्यासाठी शासनाने आर्थिक मदत मिळावी म्हणून पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना राबवली आहे.
इतकी मिळते मदत
शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून सर्व मुलांना प्रत्येक महिन्याला अडीच हजार रुपये यासोबतच मुलींना तीन हजार रुपये दिले जातील. या माध्यमातून पदवीचे शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींसाठी नक्कीच आर्थिक लाभ मिळू शकणार आहे आणि विद्यार्थी या माध्यमातून पुढील शिक्षण घेतील.
या तारखेपर्यंत अर्ज करा
शासनाने राबवलेल्या पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ही 15 एप्रिल 2023 पर्यंत सुरू असेल. शासनाच्या माध्यमातून 15 एप्रिल पर्यंत अर्ज स्वीकारले जातील पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वार्षिक 36 हजार रुपयांची मदत दिली जाईल.
या शिष्यवृत्तीसाठी पात्रता
या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्याकरिता विद्यार्थ्यांसाठी काही पात्रता निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये बारावीला विद्यार्थ्यास किमान 60 टक्के गुण असलेच पाहिजेत. यापेक्षा जर कमी गुण मिळाले असतील तर अजिबात शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार नाही. यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना 60% च्या पुढे गुण आहेत त्यांना नक्कीच लाभ भेटेल.
कोण अर्ज करू शकतो
दहशतवादी हल्ल्यांमध्ये ज्या शहीद झालेल्या पोलीस कर्मचारी यांना यासोबतच आर पी एफ जवान व इतर जवानांची मुले ज्यांना शिक्षण घ्यायचे आहे. ते अर्ज करू शकतील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची मुले जर शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यास इच्छुक असतील. तर ते सुद्धा घेऊ शकतील यासोबतच जय जवान दहशतवादी नक्षलवादी हल्ल्यात अपंग झाले आहेत त्यांची मुले सुद्धा लाभ घेऊ शकतील…
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !