पुणे लष्करी मुख्यालय येथे संवर्ग क पदांच्या विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र शैक्षणिक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . सदर पदभरती प्रक्रियाबाबत सविस्तर , जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
यामध्ये स्वयंपाकी पदांच्या एकुण 11 जागा आहेत तर कारपेंटर पदांच्या 01 , मल्टी टास्किंक स्टाफ पदांच्या 05 जागा , वॉशरमन पदांच्या 02 जागा , सफाईवाला पदांच्या 04 जागा तर इक्विपमेंट रिपेयर पदांच्या 01 जागा व टेलर पदांच्या 01 जागा असे एकुण 25 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
वरील सर्वच पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच उमेदवाराचे वय हे 18 वर्षे व 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे , यांमध्ये मागास प्रवर्गाकरीता 05 वर्षांची सुट , तर इतर मागास प्रवर्गाकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज The Officer-in-Charge, Southern Command Signal Regiment, Pune (Maharashtra) या पत्यावर दि.30 एप्रिल 2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहीतीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026