भारतीय रेल्वे सुरक्षा दलांमध्ये पोलिस जवान व पोलिस उपनिरीक्षक पदांच्या तब्बल 12,000 जागांसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्याबाबत नोटिफिकेशन भारतीय रेल्वे विभागांकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .( Railway Protection Force Recruitment Notification Publish , Number of Post Vacancy -12,000 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदांचे नाव / पदसंख्या – यांमध्ये रेल्वे सुरक्षा पोलिस जवान ( Constable ) पदांच्या एकुण 9,000 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पोलिस उपनिरीक्षक ( Sub Inspector ) पदांच्या एकुण 3,000 जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
पात्रता : यांमध्ये रेल्वे सुरक्षा जवान ( Constable ) पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी ( SSC ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर पोलिस उपनिरीक्षक पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तसेच सदर पदांकरीता उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे ते 28 वर्षांच्या दरम्याने असणे आवश्यक असणार आहे , मागास वर्गीय उमेदवारांकरीता नियमांनुसार वयांमध्ये सुट देण्यात येईल .
वेतनश्रेणी : पोलिस जवान या पदांकरीता सातव्या वेतन आयोगानुसार 21,700-69100/- या वेतनश्रेणींमध्ये वेतन आहारित करण्यात येते , अधिक महागाई भत्ता व इतर देय भत्ते अनुज्ञेय करण्यात येते .तर पोलिस उपनिरीक्षक या पदांकरीता 35,400-112,400/- अधिक अनुज्ञेय महागाई भत्ता व इतर देय भत्ते अनुज्ञेय करण्यात येते .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026