महाराष्ट्र राज्य महसुल व वन विभाग मध्ये तलाठी पदांच्या एकुण 4,644 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरुवात , असा करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य महसुल व वन विभाग अंतर्गत गट क संवर्गातील तलाठी पदांच्या एकुण 4 हजार 644 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत , महसुल विभागांकडून आज दिनांक 23.06.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेली सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

तलाठी पदांच्या एकुण 4,644 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांसाठी उमेदवार हा पदवी धारक असणे आवश्यक असणार आहे , तसेच उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे . तसेच MSCIT संगणक प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर उमेदवारांचे वय हे 18 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे , यांमध्ये मागास वर्गीय / माजी सैनिक / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांकरीता नियमानुसार वयांमध्ये सुट देण्यात येणार आहे .

वेतनमान – तलाठी संवर्गाकरीता सातव्या वेतन आयोगानुसार एस -8 मध्ये वेतनश्रेणी 25,500-81,100/- या वेतनश्रेणींमध्ये वेतन अदा करण्यात येणार आहेत अधिक अनुज्ञेय महागाई भत्ता व नियमानुसार देय इतर भत्ते अदा करण्यात येईल .

हे पण वाचा :पश्चिम रेल्वे महाराष्ट्र राज्य ( मुंबई ) विभाग मध्ये तब्बल 3,624 जागांसाठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया – सदर तलाठी संवर्गातील पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 26.06.2023 पासून ते दिनांक 17.07.2023 रोजी रात्री 23.55 मिनिटांपर्यंत  अर्ज सादर करायचे आहेत , यासाठी ऑनलाईन पद्धतीने जनरल उमेदवारांसाठी 1,000/- तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900/- आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहीतीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पहा

Leave a Comment