अखेर तलाठी ( गट – क ) संवर्गातील तब्बल 4,644 जागांसाठी अर्ज करण्यास सुरुवात ! लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग अंतर्गत तलाठी गट क संवर्गातील एकूण 4,644 पदांच्या सरळ सेवा पद्धतीने पदभरती प्रक्रिया करिता जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे कार्याकडून महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्याच्या केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहेत .ऑनलाइन पद्धतीने महसूल विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन करण्याची पदभरती जाहिरात अखेर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .

पात्रता : तलाठी पदाकरिता उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे , त्याचबरोबर उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक असणार आहे . तर कमाल वयोमर्यादा 38 वर्षापेक्षा अधिक असू नये , तर मागासवर्गीय उमेदवारांकरिता व वयामध्ये पाच वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे .

परीक्षा स्वरूप : परीक्षेची स्वरूप हे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे , पात्र उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे , कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार आहेत . एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार असल्याने सत्र एक ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिका चे स्वरूप व त्यांची काठीण्यता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण करण्याचे पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे .

सविस्तर जाहिरात / ऑनलाईन अर्ज करा

तलाठी पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 26 जून 2023 ते 17 जुलै 2023 पर्यंत असणार आहे . अर्ज सादर करण्यासाठी www.mahabhumi.gov.in संकेतस्थळावर अर्ज सादर करायचा आहे . सदर पदाकरिता अर्ज सादर करण्यासाठी अराखीव उमेदवारांकरिता 1,000/- आवेदन शुल्क तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहे .

अधिक माहितीसाठी / अर्ज सादर करण्यासाठी खालील जाहिरात पाहा / Apply Now

जाहिरात पाहा / Apply Now

Leave a Comment