पश्चिम रेल्वे महाराष्ट्र राज्य  ( मुंबई ) विभाग मध्ये तब्बल 3,624 जागांसाठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

Western Railway Recruitment Megabharati : पश्चिम रेल्वे विभागांमध्ये विविध पदांच्या तब्बल 3 हजार 624 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदांचे नावे , पदसंख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता इ. पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

यांमध्ये फिटर , वेल्‍डर , टर्नर , मशिनिस्ट , कारपेंटर , पेंटर , मेकॅनिक ( डिझेल ) , मेकॅनिक ( मोटार ) , मेकॅनिकल ( मोटार व्हेईकल ) , PASAA , इलेक्ट्रिशियन , इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक , वायरमन , मेकॅनिक Reff & AC , पाईप फिटर , प्लंबर ,ड्राफ्टसमन ( सिव्हिल ) , स्टनोग्राफर इत्यादी पदांच्या तब्बल 3,624 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

शैक्षणिक पात्रता : वरील सर्व पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर संबंधित ट्रेड मध्ये NCVT /SCVT अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : PMC : पुणे महानगरपालिका मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा : सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 15 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे तर मागासवर्गीय उमेदवारांना वयांमध्ये 05 वर्षांची तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येणार आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क  : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.rrc-wr.com/ या संकेतस्थळावर दिनांक 26 जुलै 2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता General / OBC प्रवर्गातील उमेदवारांकरीता 100/- रुपये तर मागास वर्गीय / महिला प्रवर्गातील उमेदवारांकरीता आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहीरात पाहा

Leave a Comment