राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ येथे विविध शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2023 !

Spread the love

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ येथे विविध शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University Recruitment for Various Non Teaching Staff Post , Number of Post vacancy – 08 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नावे – सहाय्यक निबंधक , फोरमॅन , वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक , कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक  ( एकुण पदांची संख्या – 08 )

पात्रता –

सहाय्यक निबंधक पदांसाठी  – कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवीमध्ये किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . किंवा 12 वी नंतर 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे .

फोरमॅन पदांसाठी – यांत्रिकी , अभियांत्रिकी / समकक्ष शाखेतील पदवीमध्ये , किमाना द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर शैक्षणिक / औद्यागिक शासकीय संस्थांमधील संबंधित कामाचा 3 ते 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे .

वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक पदांसाठी – विज्ञान शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक ,  शासकीय / शैक्षणिक / औद्यागिक संस्थेत कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक / समकक्ष पदावरील कामाचा तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे .

कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक पदांसाठी – उमेदवार हा विज्ञान शाखेतूप किमसप द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक , MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक .

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 38 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे  . ( मागासवर्गीय उमेदवारांना वयांमध्ये 5 वर्षांची सुट देण्यात येईल .)

अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने  The Registrar ,Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University , Jamnalal Bajaj Administrative Nagpur – 440033 या पत्त्यावर दि.06 मार्च 2023 पर्यंत सादर करायचा आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता 500/- आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment