रेल्वे सुरक्षा दल ( RPF ) मध्ये जवान पदांच्या तब्बल 18,348 जागेवर मेगाभरर्ती प्रक्रिया करीता नोटिफिकेशन निर्गमित झाले असून , शारिरीक व शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज प्रक्रिया लवकरच ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येणार आहेत . रेल्वेच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याच्या हेतुने त्याचबरोबर रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने रेल्वे बोर्डाने पदभरतीचा मोठा निर्णय घेतला आहे .
पदांचे नाव – रेल्वे सुरक्षा जवान ( Constable ) , एकुण पदांची संख्या 18,348
पात्रता – रेल्वे सुरक्षा जवान पदांकरीता उमेदवार हा इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमदेवाराचे वय 18 वर्षे ते 35 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे . मागासवर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये 5 वर्षे तर इतर मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये 3 वर्षांची सुट देण्यात येईल .
शारिरीक पात्रता – जनरल प्रवर्गातील उमेदवारांकरीता उंची 165 से.मी तर इतर मागावर्गीय / मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता 162.5 से.मी असणे आवश्यक आहे . तर साधारण प्रवर्ग व इतर मागास वर्गीय प्रवर्गातील महिला उमेदवारांकरीता 157 से.मी तर मागास प्रवर्गाती उमेदवारांकरती 150 से.मी असणे आवश्यक आहे .
निवड प्रक्रिया – यामध्ये उमेदवारांची प्रथम 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येते , लेखी परीक्षेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची 100 गुणांची शारीरिक चाचणी ( 1600 मीटर धावणे , लांब उडी , उंच उडी ) घेण्यात येते . दोन्ही गुणांची मिळून गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येते . निवड झालेल्या उमेदवारांची मेडिकल चाचणी घेण्यात येते . अखेर अंतिम फायनल निवड करण्यात येते .
अधिक माहितीसाठी रेल्वे बोर्डाच्या सुरक्षा दलाच्या अधिकृत्त संकेतस्थळाला भेट द्या – अधिकृत संकेतस्थळ
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .
- NLC : नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 501 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , Apply Now !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !