प्रादेशिक ग्रामिण बँकामध्ये मध्ये तब्बल 8,611 पदांसाठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

प्रादेशिक बँकामध्ये विविध पदांच्या तब्बल 8,611 जागांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . पदनाम , पदांची संख्या , आवश्यक पात्रता तसेच अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क या संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

प्रादेशिक बँकांमध्ये लिपिक संवर्गीय तब्बल 8,611 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून यांमध्ये भारतीय राष्ट्रीयकृत्त कोणत्याही प्रादेशिक बँकामध्ये नोकरी करावी लागणार आहे .भारतीय राष्ट्रीयकृत्त बँकामध्ये राज्यांनुसार प्रादेशिक विभागांनुसार बँकांची यादी नमुद करण्यात आलेली आहे .

पदांचे नावे / पदसंख्या – यांमध्ये कार्यालय सहाय्यक पदांच्या तब्बल 5,528 जागांसाठी , ऑफिसर स्केल -I पदांच्या 2,485 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . तर अधिकारी स्केल II मध्ये अग्रीकल्चर अधिकारी पदांच्या 60 जागा , मार्केटिंग अधिकारी पदांच्या 03 जागा , ट्रेझरी व्यवस्थापक पदांच्या 08 जागा , विधी अधिकारी पदांच्या 24 जागा तर चार्टर अकौंटंड पदांच्या 21 जागा , आयटी अधिकारी पदांच्या 67 जागा तर जनरल बँकिंग अधिकारी पदांच्या 332 जागा तर वरीष्ठ व्यवस्थापक पदांच्या 73 जागा अशा एकुण 8,611 जागांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

सविस्तर पदभरती जाहीरात पाहा

पात्रता – यांमध्ये कार्यालय सहाय्यक व अधिकारी स्केल -I पदांसाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर अधिकारी -II पदांसाठी उमेदवार हे संबंधित पदांनुसार आवश्यक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .सदर पदांसाठी उमेदवाराचे वय हे दिनांक 01 जून 2023 रोजी किमान 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे तर कमाल वय 30 वर्षांपेक्षा अधिक असू नयेत .

आवेदन शुल्क – यांमध्ये जनरल व इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता 850/- आवेदन शुल्क तर अनुसुचित जाती / अनुसुचित जमाती व माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांकरीता 175/- रुपये आवेदन शुल्‍क आकारण्यात येईल .

अधिक माहीतीसाठी / अर्ज सादर करण्यासाठी खालील जाहीरात पाहा

सविस्तर जाहिरात / अर्ज करा

Leave a Comment