महाराष्ट्र ग्रामिण बँक , विदर्भ कोकण ग्रामीण बँका अशा राज्यनिहाय प्रादेशिक बँकामध्ये विविध पदांसाठी तब्बल 8,611 जागांसाठी मेगाभरती !

Spread the love

केंद्र सरकारच्या बँकिंग उपक्रमानुसार राज्य सरकार व केंद्र सरकारच्या भागीदारातुन प्रादेशिक बँकांची स्थापना करण्यात आलेली आहेत . ज्यामुळे प्रादेशिक ग्रामिण भागांमध्ये बँकिंग क्षेत्राचा विकास / विस्तार व्हावा जेणेकरुन ग्रामीण भागातील नागरीकांना बँकिंग व्यवहार करणे अधिक सोयीचे होईल अशा हेतुने राज्यनिहाय प्रादेशिक बँकांची स्थापना करण्यात आलेली आहे .

सदर पदभरती देशातील सर्व प्रादेशिक बँकाकरीता करण्यात येत असून , यांमध्ये महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र ग्रामिण बँक , विदर्भ कोकण ग्रामीण बँक कार्यरत आहे . त्याचप्रमाणे केरळ राज्यात केरळ ग्रामीण बँक , मध्य प्रदेश मध्ये मध्यांचल ग्रामीण बँक ,कर्नाटक राज्यात कर्नाटका ग्रामीण बँक व कर्नाटका विकास ग्रामीण बँक , तर गुजरात राज्यात बरोदा गुजरात ग्रामीण बँक व सौराष्ट ग्रामीण बँक ,छत्तीगढ राज्यात छत्तीसगढ राज्य ग्रामीण बँक अशा राज्यनिहाय बँका कार्यरत आहेत .

सदर प्रादेशिक बँकामध्ये विविध पदांच्या तब्बल 8 हजार 611 जागांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . यांमध्ये कार्यालय सहाय्यक पदांच्या 5,528 जागा , अधिकारी स्केल – I पदांच्या एकुण 2,485 जागा तर अधिकारी स्केल -II पदांच्या एकुण -183 जागा , तर जनरल बँकिंग अधिकारी पदांच्या 332 जागा तर अधिकारी स्केल -III पदांच्या एकुण 73 अशा एकुण 8 हजार 611 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : 12 वि उत्तीर्ण असाल तर 4,165 पदांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी ,लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन ऑनलाईन पद्धतीने खालील पदनिहाय लिंकनुसार दि.21.06.2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरतीसाठी General / OBC उमेदवारांसाठी 850/- तर मागासप्रवर्ग ( SC /ST /PWD /EXSM ) उमेदवारांसाठी 175/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहे .

अधिकारी स्केल ( मल्टीपर्पज )  – I पदांसाठी Apply Now     

अधिकारी स्केल -I  सहाय्यक मॅनेजन पदांसाठी   Apply Now

तर उर्वरित सर्व  पदांसाठी  Apply Now

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहीरात पाहा

Leave a Comment