सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक , शिपाई पदांच्या तब्बल 323 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Satara co-operative Bank Recruitment for Clerk & Peon Post , Number of Post Vacancy – 323 ) पदनाम , पदांचा संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : कनिष्ठ लिपिक ,कनिष्ठ शिपाई पदांच्या एकुण 323 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ लिपिक | 263 |
| 02. | कनिष्ठ शिपाई | 60 |
| एकुण पदांची संख्या | 323 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualifiction ) :
पद क्र.01 साठी : कोणत्याही शाखेचा पदवीधर व एमएससीआयटी अथवा तत्सम अर्हता , वाणिज्य शाखेचा पदवीधर / पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपिक अथवा वरिष्ठ पदाच्या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल , त्याचप्रमाणे इंग्रजी / मराठी टंकलेखन लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांस प्रथम प्राधान्य देण्यात येईल .
हे पण वाचा : दहावी व बारावी बोर्ड परीक्षा 2025 च्या तारखा जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !
पद क्र.02 साठी : 10 वी उत्तीर्ण तसेच इंग्रजी व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 31 जुलै 2024 उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
परीक्षा शुल्क : 590/- रुपये
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.sataradccb.in/ या संकेतस्थळावर दिनांक 21 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत तब्बल 283 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- Supreme Court : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कनिष्ठ कोर्ट सहाय्यक पदाच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी महाभरती ..