शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण योजना स्टेट बँक ऑफ इंडिया सुरु केली आहे . या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 30 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे . तेही शेतजमिन खरेदी करण्यासाठी , शेतजमिनीच्या एकुण किंमतीच्या 85 टक्के रक्कम कर्ज म्हणुन दिली जाते . यामुळे शेतकऱ्यांचे शेतजमिन खरेदी करण्याचे स्वप्न या योजनेअंतर्गत पुर्ण होणार आहे .सदर योजनेची पात्रता , अर्ज प्रक्रिया , कर्ज मर्यादा , व्याजदर याविषयीची संपुर्ण माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .
स्टेट बँकेच्या या योजने अतंर्गत शेतजमिनीच्या एकुण किंमतीच्या 85 टक्के रक्कम शेतकऱ्यास कर्ज स्वरुपात शेतजमिन खरेदी करण्यासाठी मिळते . सदर योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे छोट्या शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यास मदत करणे तसेच त्यांच्याकडे शेती करण्यो योग्य जमीन नाही अशा शेतकऱ्यांना जमीन घेण्यासाठी आर्थिक सहाय्यक उपलब्ध करुन देणे . यासाठी शेतकऱ्यांकडे 5 एकर पेक्षा कमी कोरडवाहु जमीन किंवा अडीच एकरपेक्षा कमी बागायती जमीन आहे . अशा शेतकऱ्यांना जमीन खरेदीसाठी स्टेट बँकेकडुन कर्ज मिळते . शिवाय शेतमजुर / ज्यांच्याकडे शेती नाही असे मजुर देखिल या योजनेचा लाभ घेवू शकतील .
सदर योजने अंतर्गत शेतकऱ्यांस 85 टक्के कर्ज जमीन खरेदीसाठी उपलब्ध होते , तरी उर्वरित 15 टक्के रक्कम आपल्याला द्यावे लागते . परंतु सदर जमिनीची मालक बँकेच्या नावाने नोंद केली जाते . शेतकऱ्यांना सदर कर्जाचे हप्ते पुढील 7 ते 10 वर्षांमध्ये परतफेड करायची असते .शेतकऱ्यांने सदर कर्जाची रक्कम व्याजासह परतफेड केल्यास , सदर जमीनीचा ताबा शेतकऱ्यांकडे करण्यात येतो .सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड , पॅन कार्ड , जमीन खरेदी करण्याचा प्रस्तावा सोबत जोडावा लागेल .
या योजने अंतर्गत मिळणारे कर्जावर व्याजदर हे 11 % ते 14 % पर्यंत असतो .कर्जाची नियमित परतफेड केल्यास , काही रक्कम अनुदान स्वरुपात सरकारकडुन शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येते .ज्या शेतकऱ्यांची जमीन खरेदी करण्याची इच्छा आहे , अशा शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्वपुर्ण कर्ज योजना आहे .
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..