दक्षिण पुर्व-मध्य रेल्वे विभाग मध्ये तब्बल 733 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

दक्षिण पुर्व – मध्य रेल्वे विभाग मध्ये तब्बल 733 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( South East Central Railway Recruitment For Apprecntice Post , Number of Post Vacancy – 733 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या  ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी ) पदांच्या एकुण 733 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Apprecntice Post , Number of Post Vacancy – 733 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulificaton ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये समुपदेशक , शिपाई  , चौकीदार / माळी पदांसाठी पदभरती !

वयोमर्यादा ( Age limit )  : सदर पदांकीरता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी किमान वय हे 15 वर्षे तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 12.04.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment