महाराष्ट्र पोलिस दलामधील अपर पोलिस महासंचालक राज्य राखीव पोलिस बल महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांचे अधिनस्त घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांच्या सुधारित आकृतीबंधास गृह विभागाच्या दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे .
सदर शासन निर्णयानुसार , महाराष्ट्र पोलिस दलामधील अपर पोलिस महासंचालक राज्य राखीव पोलिस बल , महाराष्ट्र राज्य मुंबई या पालिस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांचे सुधारित आकृतीबंधाचा प्रस्ताव हे नविन पदनिर्मिती / पदांचे पुनरुज्जीवन व पदांचे आढावे इ. प्रस्तावांची सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय सचिव समोर प्रस्ताव सादर केला होता .
नियमित पदांच्या गट अ , ब , क व ड संवर्गातील 22,609 पदांना सदर सुधारित आकृतीबंधानुसार मान्यता देण्यात आलेली आहे . यांमध्ये पोलिस उप महानिरीक्षक , पोलिस अधिक्षक , पोलिस उप अधिक्षक , पोलिस निरीक्षक , पोलिस उप निरीक्षक , सहाय्यक पोलिस उप निरीक्षक , पोलिस हवालदार , पोलिस हवालदार , पोलिस नाईक , पोलिस शिपाई , कार्यालय अधिक्षक , सहायक लेखा अधिकारी , उच्चश्रेणी लघुलेखक , प्रमुख लिपिक , वरिष्ठ श्रेणी लिपिक , कनिष्ठ श्रेणी लिपिक , वैद्यकीय अधिकारी , परिचारिका , मिश्रक , प्रमुख आचारी , सहायक आचारी , भोजन सेवक , धोबी , न्हावी सफाईगार अशा पदांचा समावेश आहे .
हे पण वाचा : भारतीय नौदल मध्ये विविध पदांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !
बाह्यस्त्रोतद्वारे मंजुरी देण्यात आलेल्या पदांचे नावे : कार्यालयीन शिपाई , शिंपी , मोची , कक्ष नोकर / सेवक , कुक मेट , डिस्पेंसरी सर्व्हंट , मेल सर्व्हट , कक्षसेवक , दप्तरी , चौकीदार , मजदुर , फिटर , वॉलमॅन अशा एकुण 446 पदांकरीता सदर सुधारित आकृतीबंधानुसार मान्यता देण्यात आलेली आहे .
सदर वाढीव नियमित व बाह्यस्त्रोताद्वारे मंजुर पदांवर लवकरच महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .या संदर्भात गृह विभागांकडून दि.28.11.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 723 जागेसाठी महाभरती !
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !