राज्य राखीव पोलिस बल आस्थापनेतील 22,609  पदांना तर बाह्यस्त्रोताद्वारे 446 पदांकरीता मंजुरी ! वाढीव पदांकरीता होणार महाभरती !

Spread the love

महाराष्ट्र पोलिस दलामधील अपर पोलिस महासंचालक राज्य राखीव पोलिस बल महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांचे अधिनस्त घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांच्या सुधारित आकृतीबंधास गृह विभागाच्या दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे .

सदर शासन निर्णयानुसार , महाराष्ट्र पोलिस दलामधील अपर पोलिस महासंचालक राज्य राखीव पोलिस बल , महाराष्ट्र राज्‍य मुंबई या पालिस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांचे सुधारित आकृतीबंधाचा प्रस्ताव हे नविन पदनिर्मिती / पदांचे पुनरुज्जीवन व पदांचे आढावे इ. प्रस्तावांची सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्‍तरीय सचिव समोर प्रस्ताव सादर केला होता .

नियमित पदांच्या गट अ , ब , क व ड संवर्गातील 22,609 पदांना सदर सुधारित आकृतीबंधानुसार मान्यता देण्यात आलेली आहे . यांमध्ये पोलिस उप महानिरीक्षक , पोलिस अधिक्षक , पोलिस उप अधिक्षक , पोलिस निरीक्षक , पोलिस उप निरीक्षक , सहाय्यक पोलिस उप निरीक्षक , पोलिस हवालदार , पोलिस हवालदार , पोलिस नाईक , पोलिस शिपाई , कार्यालय अधिक्षक , सहायक लेखा अधिकारी , उच्चश्रेणी लघुलेखक , प्रमुख लिपिक , वरिष्ठ श्रेणी लिपिक , कनिष्ठ श्रेणी लिपिक , वैद्यकीय अधिकारी , परिचारिका , मिश्रक , प्रमुख आचारी , सहायक आचारी , भोजन सेवक , धोबी , न्हावी  सफाईगार अशा पदांचा समावेश आहे .

हे पण वाचा : भारतीय नौदल मध्ये विविध पदांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

बाह्यस्त्रोतद्वारे मंजुरी देण्यात आलेल्या पदांचे नावे : कार्यालयीन शिपाई , शिंपी , मोची , कक्ष नोकर / सेवक , कुक मेट , डिस्पेंसरी सर्व्हंट , मेल सर्व्हट , कक्षसेवक , दप्तरी , चौकीदार , मजदुर , फिटर , वॉलमॅन अशा एकुण 446 पदांकरीता सदर सुधारित आकृतीबंधानुसार मान्यता देण्यात आलेली आहे .

सदर वाढीव नियमित व बाह्यस्त्रोताद्वारे मंजुर पदांवर लवकरच महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .या संदर्भात गृह विभागांकडून दि.28.11.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

Leave a Comment