भारतीय स्टेट बँकेमध्ये सर्कल बेस्ड अधिकारी पदांच्या तब्बल 5,280 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालवधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( State Bank of India Recruitment For Circle Based Officer , Number of Post Vacancy – 5,280 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सर्कल बेस्ड अधिकारी ( CBO ) पदांच्या तब्बल 5,280 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , संवर्ग निहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात ..
संवर्ग | पदांची संख्या |
अनुसुचित जाती | 787 |
अनुसुचित जमाती | 388 |
इतर मागास प्रवर्ग | 1421 |
आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग | 527 |
खुला प्रवर्ग | 2157 |
एकुण पदांची संख्या | 2580 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच बँकेमध्ये 02 वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : सरळसेवा पद्धतीने 863 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा : सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 31 ऑक्टोंबर 2023 रोजी किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास पवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/sbicbosep23/ या संकेतस्थळावर दिनांक 12 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता 750/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग / अपंग उमेदवारांकरीता फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध गट ब व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !