आनंदाची बातमी : राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करणेबाबत , जुन्या पेन्शनचा ठराव !

Spread the love

राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना 1982 जुनी पेन्शन योजना लागू करणे बाबत नागपूर जिल्हा परिषदेने जुन्या पेन्शनचा ठराव मांडला होता . या प्रकारची ठराव घेणारी नागपूर जिल्हा परिषद ही पहिली जिल्हा परिषद ठरली आहे .

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितले होते की , राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल . परंतु अद्याप पर्यंत राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही .यामुळे नागपूर जिल्हा परिषदेने राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात ठराव मांडला होता या ठरावाला काँग्रेस सदस्यांचे समर्थन मिळाले .

तर ठरावा दरम्यान भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) सदस्यांनी सभा त्याग केला . यामुळे भाजप – शिवसेना (शिंदे गट ) पक्षाची जुनी पेन्शन बाबत भूमिका स्पष्ट होत आहे .काँग्रेस पक्षाचे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे बाबत समर्थन मिळत आहे .

नागपूर जिल्हा परिषदेने जुनी पेन्शन बाबत ठराव मांडल्याने राज्य कर्मचाऱ्यांना समर्थनाची थाप मिळत आहे . सध्या भारतीय जनता पक्षाला देशामध्ये जुनी पेन्शन या मुद्द्यावर निवडणुकीमध्ये हार पत्करावी लागत आहे .

Leave a Comment