राज्य शासनाच्या विविध विभागामधील / कार्यालयांच सुधारित आकृत्तीबंध अंतिम झालेला आहे अशा विभाग / कार्यालयांतील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास या शासन निर्णयान्वये मुफा देण्यात येत आहे .यामध्ये वाहनचालक व वर्ग – ड संवर्गातील पदे भरती प्रक्रियेमधुन वगळण्यात आली आहेत .या संदर्भातील वित्त विभागाचा दि.31.10.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अंदाजे 75,000 सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा शासनाचा मानस आहे . सदर पदे भरण्याचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य व्हावे यासाठी केवळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम मंजुर केलेले नाहीत , अशा विभाग / कार्यालयांतील पदे देखिल भरतीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत . या निर्णयान्वये वित्त विभागाच्या दि.30 सप्टेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत .यामुळे सरळसेवेतील पदे भरती प्रक्रियेसाठी उपलब्ध झाले आहेत .
ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृत्तीबंध अद्याप मंजुर केलेले नाहीत , त्या प्रशासकीय विभागांनी त्यांचा व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांतील पदांचा आढावा घेवून उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने सुधारित आकृतीबंध अंतिम मंजुर करण्याची कार्यवाही तत्परतेने पुर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भाती विभागाचा दि.31.10.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- बृहन्मुंबई भाभा दवाखाना अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम : पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी दरमहा मानधन योजना – अर्ज करण्यास सुरुवात .
- BAMU : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती !