सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वाढीव पेन्शनकरीता सरकारकडुन मार्गदर्शक तत्वे जारी , जाणून घ्या सविस्तर वृत्त !

Spread the love

सुप्रिम कोर्टाने दिलेल्य निर्णयानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाकडुन मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आलेली आहेत .सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर ईपीएफओ कडुन सदरची कार्यवाही केली आहे . या संदर्भातील सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे पाहुयात ..

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांना वाढीव पेन्शन करीता कश्या पद्धतीने अर्ज करावे यासाठी मार्गदर्शन करण्यात आलेले असून वाढीव पेन्शनसाठी आवश्यक पात्रता निकष देण्यात आलेले आहेत .सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर तात्काळ आठ आठवड्यांच्या कालावधीमध्ये सदर निर्णयाची अंमलबजावणी फंडांनी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ईपीएफओला दिला आहे .

ह्या कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव पेन्शन –

01 सप्टेंबर 2014 पुर्वी सेवेतुन निवृत्त झालेले व वाढीव निवृत्तीवेतनचा ऑप्शन स्विकारलेले कर्मचारी सदस्य या वाढीव पेन्शनचा लाभ घेण्याकरीता पात्र ठरणार आहेत . EPS मध्ये मासिक 5,000/- रुपये किंवा 6,500/- रुपये मर्यादेपेक्षा अधिक योगदान दिलेले कर्मचारी वाढीव पेन्शन करीता पात्र ठरतील तसेच EPS – 15 या योजने अंतर्गत सहभागी असलेले सदस्य तसेच वाढीव पेन्शन पर्यायाची निवड केलेले कर्मचारी यासाठी पात्र ठरणार आहेत .

यासाठी सदर नमुद पात्र कर्मचाऱ्यांनी वाढीव पेन्शनसाठी ईपीएफओ च्या प्रादेशिक कार्यालयामध्ये जावून आवेदन करावे लागेल .कर्मचारी विषयक / सरकारी पदभरती त्याचबरोबर शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट साठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment