महाराष्ट्र राज्य शासनांकडून महसुल व वन विभागांतर्गत गट क संवर्गातील तलाठी पदांच्या एकुण 4,625 पदांच्या सरळसेवा पद्धतीने भरती करण्यासाठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक , भुमि ( महाराष्ट्र राज्य ) पुणे कार्यालयाकडून दि.17.08.2023 ते 12.09.2023 या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील एकुण 36 केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहेत .
तलाठी पदभरती संदर्भात राज्य शासनांकडून दि.02.06.2023 रोजी प्रारुप पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . सदर पदभरती जाहीरातीनुसार पदसंख्या व आरक्षामध्ये बदल झाल्यास याबाबतची घोषणा / सुचना वेळोवेळी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत .कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसामान्य रहीवासी असणाऱ्या अमेदवारांना अनुज्ञेय अअसणार आहे , सर्वसामान्य रहीवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधत्व कायदा 1950 च्या कलम 20 अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असणार आहे .
आवश्यक पात्रता – तलाठी या पदांकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवी धारक असणे आवश्यक असणार आहे किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातुन समकक्ष शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .MSCIT / CCC संगणक प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी दि.01.01.2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे पुर्ण तर कमाल वय हे 38 वर्षांपेक्षा अधिक असू नयेत . तर मागास / राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता किमान वय 18 तर कमाल वय 43 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे .
आवेदन शुल्क – पेसा / नॉन पेसा दोन्ही क्षेत्रातील पदभरती साठी खुल्या प्रवर्गातील उमदेवारांकरीता आवेदन शुल्क म्हणून 1000/- रुपये तर मागास / राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया – महसुल विभागांकडून निर्गमित करण्यात आलेली जाहीरात ही प्रारुप स्वरुपातील जाहीरात असल्याने , यांमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत . सदर प्रारुप जाहीरातीनुसार ,अर्ज भरण्याचा कालावधी हा जून 2023 ते जुलै 2023 रोजी 23.59 या कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या संकेतस्थळावर सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोशिएशन , पुणे अंतर्गत केवळ महिला उमेदवारांसाठी पदभरती ; Apply Now !
- आदिवासी विकास विभाग अमरावती , नाशिक , ठाणे , नागपुर अंतर्गत विविध गट ब & क संवर्गातील तब्बल 614 जागेसाठी महाभरती !
- राज्यातील खाजगी / निमशासकीय / सहकारी क्षेत्रातील 1280+ जागेसाठी महाभरती जाहीराती !
- सैनिकी शाळा व अकादमी छ.संभाजीनगर येथे विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- SSK पब्लिक स्कुल व महाविद्यालय , नाशिक अंतर्गत शिक्षक , लिपिक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती !