महराष्ट्र शासन सेवेत तलाठी पदभरती प्रक्रीया बाबत अखेर महसूल व वन विभाग कडुन तलाठी पदांच्या जिल्हानिहाय तपशिल सादर करण्यात आला आहे .यामध्ये रिक्त पदे व नव्याने निर्माण करण्यात आलेल्या एकुण 4122 पदांसाठी मेगाभर्ती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . या संदर्भातील महसूल व वन विभागाकडुन प्रसिद्ध झालेली सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
राज्यातील तलाठी गट क संवर्गाची दि.31.12.2020 अखेर रिक्त असलेली 1012 पदे तसेच तलाठी संवर्गाची नव्याने निर्माण करण्यात आलेली 3110 पदे अशा एकुण 4122 पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यास राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे .त्या अनुषंगाने महसूली विभागनिहाय तलाठी संवर्गाच्या भरावयाचा पदांचा तपशिल सदर जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .जिल्हानिहाय यापूर्वी मान्यता दिलेली पदे , नव्याने निर्माण करण्यात आलेली पदे विभागनिहाय विवरण करण्यात आलेले आहेत .सदर पदे हे नव्याने सुधारित केलेल्या बिंदुनामावलीनुसार तयार करण्यात आलेली आहेत .
शिवाय ज्या विभागाडुन बिंदुनामावली अद्यापर्यंत सादर करण्यात आले नाहीत , अशा विभागांनी विवरण पत्रातील विवरणपत्रानुसार जिल्हानिहाय माहिती कोणत्याही परिस्थितीत 15 दिवसात शासन पाठविण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत .या संदर्भातील महसूल व वन विभागांकडुन निर्गमित झालेली तलाठी जाहीरात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026