Thane Rural : ठाणे ग्रामीण पोलिस दलांमध्ये पोलिस शिपाई , चालक पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका .

Spread the love

ठाणे ग्रामीण पोलिस दलांमध्ये पेालिस शिपाई व चालक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . (Thane Rural Police Department Recruitment For Police Constable  & Driver Post , Number of Post Vacancy – 119  ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये पोलिस शिपाई पदांच्या एकुण 81  जागा तर पोलिस शिपाई चालक पदांच्या 38 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Police Constable & Driver Post , Number of Post Vacancy – 119 )

शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) ; सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच MSCIT / CCC प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : वस्त्र मंत्रालय विभाग मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती ;

वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता कमाल वय हे 33 वर्षे तर अपंग प्रवर्गातील उमेदवारांकरीता कमाल वय हे 45 वर्षे पर्यंत सुट देण्यात येत आहे .

हे पण वाचा : सोलापूर जिल्हा पोलिस दलांमध्ये पोलिस शिपाई , चालक पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका .

शारीरिक पात्रता : सदर पदांकरीता पुरुष उमेदवाराची किमान उंची ही 168 से.मी पर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . तसेच छाती 79 से.मी तर 05 से.मी फुगवता आली पाहिजे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://policerecruitment2024.mahait.org/ या संकेतस्थळावर दिनांक 05 मार्च 2024 पासुन ते दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 450/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 350/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment