MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत गट -क संवर्गातील विविध पदांच्या 1333 जागेसाठी महभरती ; लगेच करा आवेदन ..

Spread the love

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत गट -क संवर्गातील विविध पदांच्या 1333 जागेसाठी महभरती ; प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Maharashtra Public Service Commission Recruitment for various post , Number of post vacancy – 1333 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.उद्योग निरीक्षक39
02.कर सहाय्यक482
03.तांत्रिक सहायक09
04.बेलिफ व लिपिक17
05.लिपिक टंकलेखक786
 पदांची संख्या1333

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 साठी : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी / तंत्रज्ञानातील डिप्लोमा / विज्ञान शाखेतील पदवी उत्तीर्ण .

पद क्र.02 साठी : पदवी , इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि

पद क्र.03 साठी : पदवी उत्तीर्ण

पद क्र.04  व 05 साठी : पदवी , इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.02.2025 रोजी ( मागास / अनाथ / आ.दु.घ करीता 05 वर्षाची सुट )

पद क्र.03 साठी किमान वय 18 तर कमाल 38 वर्षे दरम्यान तर उर्वरित सर्व पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 19-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया /आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर दि.14.10.2024 पासुन ते 04.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . तर सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग साठी 394/- रुपये तर आ.दु.घ /अनाथ / मागास प्रवर्ग करीता 294/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment