वसई विरार महानगरपालिका मध्ये फक्त 10 वी पात्रताधारकांसाठी पदभरती प्रकिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Vasai Virar Mahanagarpalika Recruitment for Breeking Checkers , Number of Post Vacancy – 14 ) पदनाम , पदसंख्या व आवश्यक पात्रता , वेतनमान याबाबत सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदसंख्या / पात्रता : वसई विरार महानगरपालिका मध्ये ब्रिडिंग चेकर्स ( Breeding Checkers ) पदांच्या एकुण 14 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे किमान 10 वी ( SSC ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक तर कमाल वयोमर्यादा 43 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे .
कामाचे स्वरुप – सदर पदाला दैनंदिन गृहभेट देवून कंटेनर तपासणी करुन डास अळी शोधणे Breeding Survey दररोज किमान 200 घरांची तपासणी करुन दुषित भांडी रिकामी करणे , सर्वेक्षण करताना सोबत 1 टक्के डास अळी नाशक घेवून वापर करणे व इतर अनुषंगिक कामे करावी लागणार आहेत .
हे पण वाचा : MPSC अंतर्गत कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग पदांसाठी पदभरती ! Apply Now !
वेतनमान – सदर पदांसाठी प्रतिमहा 11,250/- रुपये वेतनमान अदा करण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने वसई विरार शहर महानगरपालिका , वैद्यकीय आरोग्य , चौथा माळा , प्रभाग समिती सी कार्यालय विरार ( पुर्व ) या पत्त्यावर दि.26 मे 2023 पर्यंत सादर करावे . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा / आवेदन फीस आकारण्यात येणार नाहीत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026