NNS BANK : नागपूर नागरिक सहाकरी बँक मध्ये लिपिक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nagpur Nagarik Sahakari Bank Ltd , Recruitment for Clerk Post , Number of Post Vacancy – 50 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या – यांमध्ये लिपिक या पदांच्या एकुण 50 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठामधून पदवी मध्ये 50 टक्के गुण घेवून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . (मागास वर्गीय उमेदवारांसाठी 45 टक्के गुण ) तसेच संगणकाचे संपुर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांचे वय दि.01 मे 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे यामध्ये मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : भारतीय नौदल मध्ये 12 वि पात्रता धारकांसाठी 1465 जागांसाठी मेगाभर्ती 2023 !
अर्ज प्रक्रिया आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने THE CHIEF EXECUTIVE OFFICER, NAGPUR NAGRIK SAHAKARI BANK LTD., 79, WARDHAMAN NAGAR, DR, AMBEDKAR SQ., CENTRAL AVENUE, NAGPUR-440008 या पत्त्यावर दि.07.06.2023 पर्यंत सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 700/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल , आवेदन शुल्कांमध्ये मागास वर्गीय उमेदवारांनी सुट देवून 350/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती .
- MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- महाराष्ट्र अग्निशमन सेवा अंतर्गत फायरमन व अधिकारी पदांसाठी प्रवेश प्रक्रिया 2027 अंतर्गत भरती ..
- कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 148 रिक्त जागेसाठी पदभरती .
- AVNL : आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1213 रिक्त जागेसाठी पदभरती ..