पुणे पिपल्स सहाकारी बँक लिमिटेट मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune People’s Co-operative Bank Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 22 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
मुख्य महाव्यवस्थापक – मुख्य महाव्यवस्थापक पदांच्या एकुण 01 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमदेवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , / DCBM /CA /ICWA /CAIIB , DBF तसेच बँकींग क्षेत्रातील मध्यम वरीष्ठ व्यवस्थापकीय स्तरावील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल . तसेच सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 35 वर्षे व कमाल वय 60 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .
अधिकारी – अधिकारी पदांच्या एकुण 15 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच सहकारी बँकतील / इतर वित्तीय संस्थामधील अधिकारी / लेखनिक / सिनिअर लेखनिक पदांवर काम केल्याचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांस प्राधान्य देण्यात येईल . सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 25 वर्षे ते 40 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : नागपूर नागरिक सहकारी बँक मध्ये पदभरती प्रक्रिया 2023 !
सफाई कामगार व्यवस्थापक – सफाई कामगार व्यवस्थापक पदांच्या एकुण 06 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे . सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 33 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज https://www.punebankasso.com/default.aspx या संकेतस्थळावर दि.31.05.2023 पर्यत ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1180/- आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026