पश्चिम – मध्ये रेल्वे विभाग मध्ये विविध पदांच्या तब्बल 3317 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

पश्चिम – मध्ये रेल्वे विभाग मध्ये विविध पदांच्या तब्बल 3317 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( West Central Railway Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 3317 ) सविस्तर महाभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये कारपेंटर , काम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट , इलेक्ट्रिशियन , इलेक्ट्रानिक मेकॅनिक , फिटर , पेंटर , प्लंबर , पंप ऑपरेटर कम मेकॅनिक , वेल्डर , डिजिटल फोटोग्राफर , ड्राफ्टसमन , हाऊस किपर , इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन , मेडिकल लॅबोरॉटरी तंत्रज्ञ , रिसेप्सनिस्ट , स्टेनोग्राफर , स्वय सहाय्यक , टर्नर , वायरमन इ. पदांच्या एकुण 3317 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

मेडिकल लॅबोरॉटरी तंत्रज्ञ पदासाठी : सदर पदांकरीता उमेदवार हे 12 वी उत्तीर्ण ( PCB ) सह , NCVT / SCVT

उर्वरित इतर सर्व पदांकरीता : उमेदवार हे 50 टक्के गुणांसह इयत्ता 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : IBPS : IBPS मार्फत PO / MT पदांच्या तब्बल 4455 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे   https://nitplrrc.com/ या संकेतस्थळावर दिनांक 04 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदांकरीता जनरल /  ओबीसी प्रवर्ग करीता 141/- रुपये परीक्षा शुल्क तर SC /ST / PWD /  महिला प्रवर्ग करीता 41/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment