स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त राज्य शासन सेवेमध्ये रिक्त पदांपैकी तब्बल 75 हजार जागांसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्याचे उद्दिष्ट्ये राज्य सरकारने ठरविले आहे .सदर जिल्हा परिषदेमध्ये रिक्त जागांवर वर्ग क पदांकरीता प्रत्यक्ष पदभरती प्रक्रिया पुढील महिन्यापासून सुरु होणार आहे . या संदर्भात ग्राम विकास विभागांडुन दि.15 नोव्हेंबर 2022 रोजी शासन निर्णय देखिल निर्गमित झालेला आहे .
राज्य शासनाच्या जिल्हा परिषदांमधील वर्ग -क यामध्ये वाहनचालक व गट – ड संवर्गातील पदे वगळून रिक्त जागांपैकी 80 टक्के जागेवर आरक्षण निश्चित करण्यात आलेले आहेत . सदर रिक्त जागेपैकी 80 टक्के पदे भरण्यास राज्य शासनाकडुन मंजुरी देखिल मिळालेली आहे . यामध्ये प्रामुख्याने ग्रामसेवक , कनिष्ठ लिपिक , शिक्षक , सहाय्यक , लेखाधिकारी , विस्तार अधिकारी ,प्रयोगशाळा सहाय्यक , आरोग्य विभाग – नर्स इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत .
ग्रामविकास विभागाकडुन निर्गमित झालेल्या शासन निर्णयान्वये पदभरतीची जाहीरात दि.01 ते 07 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे . तर अर्ज सादर करण्याची तारिख 08.02.2023 ते दि.22.02.2023 पर्यंत असणार आहे .सदरची पदभरती प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून ऑनलाईन परिक्षेचा कालावधी दि.14 एप्रिल 2023 ते दि.30 एप्रिल 2023 असा असणार आहे .
सदर पदभरती प्रक्रिया बाबत सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !